जागतिक मुद्रण दिन : इतिहास मुद्रण कलेचा

जागतिक मुद्रण दिन : इतिहास मुद्रण कलेचा

     आज डिजिटल माध्यमांचे युग जरी असले तरी मुद्रनामुळे आज सर्वच क्षेत्र व्यापले आहे. आता डिजिटल प्रिंटिंग मशीन उपलब्ध आहेत. तसेच लाखो वृत्तपत्र काही तासातच छापले जातात परंतु या अगोदर शिळाप्रेस वर किंबहुना हाताने सुद्धा लिहून वृत्तपत्र प्रकाशित केले जात असत. ही मुद्रण कला कशी अस्तित्वात आली याबद्ल आज आपण जाणून घेणार आहोत. हा लेख लिहण्याचे औचित्य म्हणजे ज्याने या मुद्रण कलेचा शोध लावला त्याचा आज जन्मदिवस.
     मुद्रण कलेला या वर्षी 978 वर्ष पूर्ण झालीत. खरंतर मुद्रण पद्धतीचा शोध इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात चीनमध्ये लागला. आजपर्यंतच्या प्रदीर्घ कालखंडात कोणत्याही क्षेत्रात झाली नाही इतकी प्रचंड गतीने प्रगती मुद्रण कला आणि त्याच्या वेगवेगळ्या पद्धती यामध्ये झाली आहे. जेव्हा कागद अस्तित्वात नव्हते, तेव्हा मानव आपल्या मनातील भावभावनांचे, आपल्याला व्यक्त कराव्याशा वाटणाऱ्या गोष्टींचे चित्रण दगडांवर कोरून करत असे. यावेळी मुद्रण पद्धतीत वापरल्या जाणाऱ्या साहित्यामध्ये कागद, शाई आणि मुद्रण प्रतिमा यांचा समावेश होता. मुद्रनाची प्रतिमा कोरून तयार केलेल्या पृष्ठांची असे. बौद्ध धर्मातील काही विचार, मजकूर म्हणून संगमरवरी दगडी खांबावर कोरून ठेवलेले असत. जेव्हा यात्रेकरू अशा ठिकाणी जात तेव्हा या कोरलेल्या मजकुरावर विशिष्ट शाई लावून त्यावर ओलसर कागद दाबून मुद्रणाचा ठसा मिळवीत असत. यातूनच चीनमध्ये मुद्रण प्रतिमेद्वारे मुद्रणाचे तंत्र सापडले. सहाव्या शतकानंतर या संगमरवरी दगडाच्या जागी लाकूडाचा वापर होउ लागला. दगडावर अक्षर कोरण्यापेक्षा लाकडावर कोरणे अधिक जास्त सोपे आणि सोयीस्कर होते. इ. स. १०४१-४८ दरम्यानच्या कालखंडात बी शंग नावाच्या चिनी किमयागाराने मुद्रणासाठी खिळ्यांची संकल्पना आणण्याचा प्रयत्न केले. इसवी सन १४३४-१४३९ या कालखंडात जर्मनीतील मुद्रणकलेचे जनक योहानेस गुटेनबर्ग यांचा जन्मदिन २४ फेब्रुवारी १३९८ रोजी झाला. हा दिवस जागतिक मुद्रण दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.
     जर्मनीतील मेंज येथे राहणारे योहानेस गुटेनबर्ग यांनी १४३९ मध्ये प्रिंटींग प्रेसची निर्मिती केली. गुटेनबर्ग यांनी लावलेल्या शोध मुद्रण कलेतील मोलाचा दगड ठरला. आजतागायत त्यात वेळोवेळी बदल होत आज त्याचे स्वरूप खूप बदलले आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात चीनमध्ये खरंतर मुद्रण पद्धतीचा शोध लागला, त्यानंतर आजपर्यंतच्या प्रदीर्घ कालखंडात कोणत्याही क्षेत्रात झाली नाही इतकी प्रचंड गतीने प्रगती मुद्रण कला आणि पद्धती यामध्ये झाली आहे. गुटेनबर्ग यांनी मुद्रा, मातृका आणि शिशाचा एकत्रित वापर करून टिकाऊ अशी सुटी अक्षरे तयार केली. या सुट्या अक्षरांचा सामूहिक संच वापरून मुद्रणाचे तत्र त्यांनी निर्माण करून, गुटेनबर्ग यांनी ४० पानांचे बायबल छापले. हे बायबल हे जगातील पहिले छापिल पुस्तक मानले जाते.
       गुटेनबर्ग यांनी पुढे योहान फुस्ट यांच्याबरोबर जर्मनीमध्ये माइनत्स येथे मुद्रणाचा व्यवसाय भागीदारीमध्ये सुरू केला. १४५५ मध्ये गुटेनबर्ग यांनी चल अक्षरांचा व मुद्रणाचा शोध लावून मुद्रण कालावधीत घट करण्यात यश मिळवले. १८८० नंतर अमेरिकेत ओटमार मेर्गेन्टालर यांनी ‘लायनोटाईप’ नावाचे एक पूर्ण ओळ जुळवण्याचे यंत्र शोधून काढले.
     जेव्हापासून मुद्रण कलेचा शोध लागला तेव्हापासून म्हणजेच १०४१ पासून आजतागायत मुद्रण कलेमध्ये सातत्याने विकास होत गेला. कालांतराने लाकडाची जागा हळूहळू लोखंडाने घेतली. हातांच्या साहाय्याने चालणारे यंत्र वाफेवर चालू लागले. इ.स. १८४९ मध्ये या यंत्रांना गती देण्यासाठी विजेचा वापर होऊ लागला. विजेवर चालणाऱ्या छपाईयंत्रामध्ये देखील विकास होत गेला. ऑफसेट प्रिंटिंगने तर ‘ना भूतो ना भविष्यति’ अशी क्रांतीच केली. रोजचे वर्तमानपत्र हे अशाच प्रक्रियेतून छापले जाणारे मुद्रित साहित्याचे उत्तम उदाहरण आहे. आज तर डिजिटल प्रिंटिंग मुले काय घडते आहे हे आपण पाहतोच आहोत. आज आपण विविध विषयांची पुस्तके, मासिके, ग्रंथ, पत्रके तसेच आता अमेझोन सारखे किंडल तसेच ई-बूक मोबाईलवर आपण वाचू शकतो, ते केवळ मुद्रण क्रांतीमुळे.

 

 

 

ParmeshwarThate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *