दिवसभर कधी, कुठं फिरता याची गुगलकडे माहिती, खोट वाटत असेल तर तुम्ही चेक करू शकता

दिवसभर कधी, कुठं फिरता याची गुगलकडे माहिती, खोट वाटत असेल तर तुम्ही चेक करू शकता
                                                                                               गुगल तुमच्या दिवसभराच्या अपडेट सेव्ह करत आहे. फक्त एकाच दिवसाचे नाही. तर जेव्हापासून फिचर सुरु केलं                                         आहे. तेव्हापासून तुम्ही कधी, कुठं फिरलात याची माहिती गुगलकडे आहे.
        आजचे युग हे स्मार्टफोनचे युग आहे. आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन  असल्याने सारे जग आपल्या मुठीत असल्यासारखा आभास होतो व काही प्रमाणात ते खरेही आहे. क्षणार्धात जगातील घातलेली कोणतेही घटना आपल्याला Whats app व इतर Social Media मुळे सहज समजते. तसेच या स्मार्टफोनवर ऑनलाइन माहिती सर्च करण्यापासून ते खरेदीपर्यंत अनेक गोष्टी करता येतात. या सर्वच कामे हातात स्मार्टफोन आल्यापासून सोपी झाली आहेत. आज ची तरुणाई तर सर्वच गोष्टी ऑनलाईन करण्यावर जास्त भर देते. काही कंपनी त्यांना कॅशबॅक हि देते. परंतु हे सगळ करत असतांना आपण सगळी माहिती संबधीत कंपनीला अनावधानाने पुरवीत असतो. आपण कोणत्याही वेबसाईट काही माहिती सर्च करणे किंवा खरेदी करण्यासठी गेलो. त्या वेळेस वेबसाईट युजर्सची पूर्ण माहिती त्यात पूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर, पिन कडे, आधार कार्ड, पॅन कार्ड Details, आवडी- निवडी,  घेतली जाते. आपण स्मार्टफोन मध्ये असे अनेक Application  वापरत असतो. त्यावर जी माहिती Application Install करताना आपल्याकडून दिली जाते. ती संबंधित App कंपनी वापरत असते. गुगल आणि फेसबुक या माहितीच्या आधारे जाहिरातीतून पैसे कमावते. पण तुम्हाला कल्पनाही नसेल की गुगल तुम्ही कधी, कुठे, किती वाजता गेला होता याची माहितीही साठवून ठेवते.

    आपण सहज गुगल Map वर माहिती सर्च करतो व ते तेथे सहज सेव  होत जाते.  आपण एखाद्या website वरून एखादी वस्तू Search केली तर आपल्याला दुसर्याही Website वर समोर दाखवली जाते कारण आपण याअगोदर आपण सर्व माहिती त्यांना पुरवलेली असते. त्याचा या Website पुरपूर वापर करतात. फेसबुक किंवा गुगलवर अनेकदा आपल्याला नोटिफीकेशन येतं. यामध्ये जवळच्या चित्रपटगृह, पेट्रोल पंप, एटीएम किंवा एखाद्या बँकेबद्दल काहीतरी विचारलं जातं. फेसबुकवर तर चेक इन करून मिरवत सर्वांना सांगतो की या ठिकाणी आहे. गुगलने यापुढे जाऊन तुम्ही जिथं भेट दिली किंवा थांबलात तिथं कसा अनुभव आला याची माहिती घ्यायला सुरुवात केली. स्मार्टफोन वापरणाऱ्याला याबद्दल प्रश्न विचारला जातो. या माहितीच्या आधारे गुगल त्या ठिकाणाचे रेटिंग ठरवते.
          तुम्ही ज्या ठिकाणी भेट देता ती सर्व माहिती गुगल साठवते. त्याचा एक मॅपही तयार होत असतो. प्रत्येक अपडेट ठिकाणाचे नाव आणि वेळेसह गुगलकडे आपोआप save होत असते. आपल्याला केव्हा कुठे गेलो होतो हे आपण चेक करू शकतो कदाचित आपणही सांगू शकणार नाही इतकी अचूक गुगल तुम्हाला माहिती उपलब्ध करून देईल. किंबहुना आपण जेव्हा पासून मोबाईल घेतला तेव्हा पासून चा रेकॉर्ड सुद्धा गुगल कडे उपलब्ध आहे याला फक्त आत एकच आहे कि, ज्या वेळेल तुम्ही ज्या ज्या ठिकाणी गेला होता त्या वेळेस तुमच्या फोनचे इंटरनेट व जीपीएस लोकेशन ऑन असायला पाहिजे. जीपीएस ऑफ असेल तर ही माहिती गुगलला मिळत नाही.  हे सर्व तुम्ही पण चेक करू शकता यासाठी आपल्याला मोबाईलवरून किंवा कॉम्प्युटरवरून जीमेल लॉगइन करावं लागेल. तेथे Map मध्ये जाऊन  “Your Timeline” वर Click करा तेथे तुम्ही वर्ष, महिना, तारीख टाकून त्या दिवसभरात कुठे गेला होतात याची माहिती घेऊ शकता.  यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
           

                                         हे सर्व नको असेल तर तुम्ही तुमची  लोकेशन हिस्ट्री बंद करूनही गुगलला जाणारी माहिती थांबवू  शकता

ParmeshwarThate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *