भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके

भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके
      भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया ज्यांनी रोवला ते धोंडीराम गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांची आज पुण्यतिथी. भारतातील ते चित्रपट निमिर्ती करणारे ते पहिले निर्माते ठरले म्हणूनच त्यांना चित्रपट सृष्टीचा जनक मानले जाते.
दादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हा चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार १९६९ पासून दिला जातो. भारतीय सिनेमात असामान्य कामगिरी करणार्‍या कलावंत व तंत्रज्ञांना हा पुरस्कार भारत सरकारच्या भारत सरकारच्या माहिती व नभोवाणी खात्यातर्फे दिला जातो. अनेक वेळा या पुरस्काराची रक्कम बदलण्यात आली. सुरुवातीला १९६९ ला ११ हजार, ढाल व शाल असे स्वरूप होते मात्र २००६ पासून सुवर्णकमळ, १०,०० ००० रुपये व शाल असे आहे.
    दादासाहेब फाळके यांचा जन्म नाशिकहून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे ३० एप्रिल, १८७० रोजी झाला. त्यांचे वडील एलिफन्स्टीन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. ते प्रसिद्ध संस्कृतज्ञ होते. यामुळे दादासाहेब फाळेकेचे प्राथमिक शिक्षण मुंबईतच झाले. नंतर त्यांनी १८८५ मध्ये जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये प्रवेश घेतला. आणि फर्स्ट क्लासने उत्तीर्ण झाले. तसेच नंतर त्यांनी “ड्रॉईंग”, “पेंटिंग”, ”मॉडेलिंग” तसंच फोटोग्राफीचं शिक्षण घेतलं. त्यावेळी त्यांनी ५ पौंडला एक सस्ता कॅमेरा विकत घेतला. दादासाहेब फाळकेनी गोध्रा येथे छायाचित्रकार म्हणून व्यवसाय सुरू केला. लवकरच, त्यांची ल्युमिएर बंधूंनी नेमलेल्या ४० ‘जादूगारां’पैकी एकाशी, जर्मन कार्ल हर्ट्‌झ याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांना ‘भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थेसाठी ड्राफ्ट्समन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या धडपड्या स्वभावामुळे लवकरच ते नोकरीच्या बंधनांना कंटाळले व त्यांनी छपाईचा व्यवसाय सुरू केला.
        शिळाप्रेस छपाईच्या तंत्रात ते कुशल होते. त्यांनी राजा रविवर्मांसोबत काम केले. पुढे त्यांनी स्वत:चा “फळकेज आर्ट अँड प्रिंटींग वर्क्स नावाचा छापखाना सुरु केला. छपाई व्यवसायात त्यांच्या सहकाऱ्यांशी त्यांचे विवाद झाले. आणि फाळकेंनी छपाईच्या व्यवसायास रामराम ठोकला. १९११ मध्ये येशुच्या जन्मावर आधारित “लाईफ ऑफ ख्राईस्ट” या चित्रपटापासून प्रेरणा घेत भारतात ही चित्रपट बनवण्याचा त्यांनी निश्चय केला. हा मूकपट पाहिल्यानंतर त्यांनी आपले लक्ष हलत्या चित्रांच्या व्यवसायाकडे वळवले
        फेब्रुवारी १९९२ मध्ये ते फिल्म प्रोडक्शनचा कोर्स करण्यासाठी व चित्रपट विषयक तांत्रिक ज्ञान मिळवण्यासाठी ते लंडन गेले. तेथून तिथुन त्यांनी कॅमेरा, कच्ची फिल्म सारखं साहित्य खेरेदी केलं आणि १ एप्रिल १९१२ मध्ये “फाळके फिल्म्स” ची स्थापना केली. जून-जुलै महिन्यात “रोपट्याची वाढ” या लघुपटाचा त्यांनी यशस्वी प्रयोग ही केला; “राजा हरिश्चंद्र” यांच्यावर आधारित मुकपटाची निर्मिती करण्याचं शिवधनुष्य दादासाहेबांनी यशस्वीरित्या पेललं; खर्‍या  अर्थानं हे सिनेसृष्टीत पडलेलं पहिलं पाऊल होतं. “राजा हरिश्चंद्र” या मुकपटाचं लेखन, संवाद, दिग्दर्शन हे दादासाहेब फाळकेंचच होतं. या पहिल्याच चित्रपटाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. व १९१२ साली त्यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला मूकपट तयार झाला .जो ३ मे १९१३ साली मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रेक्षकांसाठी पहिल्यांदा दाखवण्यात आला. त्यानंतर दादासाहेब फाळकेनी मोहिनी भस्मासूर (इ.स. १९१३), सावित्री सत्यवान (इ.स. १९१४), श्रीकृष्णजन्म (इ.स. १९१८), कालिया मर्दन (इ.स. १९१९), सेतुबंधन (इ.स. १९३२), गंगावतरण (इ.स. १९३७) असे एकापेक्षा एक चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली.
       पुढे “हिंदुस्थान सिनेमा कंपनी” स्थापन करुन एकदंर ४७ चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. “गंगावतरण” हा फाळकेंनी निर्मिती केलेला पहिला बोलपतट  होता. या व्यतिरिक्त दादासाहेब फाळके यांनी त्यांच्या कारकिर्दीत ३० लघुपटांची निर्मिती केली. या  भारतीय चित्रपटाचे  जनक दादासाहेब फाळके यांचं निधन १६ फेब्रुवारी १९४४ रोजी नाशिक येथे झालं. २९ जानेवारी २०१० ला परेश मोकाशी दिग्दर्शीत दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारीत हरीश्चंद्राची “फॅक्टरी” हा चित्रपट प्रदर्शित झाला.  दादासाहेबांच्या जीवनपट खऱ्या अर्थाने लोकांसमोर आला.

 

 

ParmeshwarThate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *