महाराष्ट्र राज्यातील जिल्हे व त्यांचे निर्मिती वर्ष1. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या वेळी म्हणजे 1960 साली राज्यातील जिल्ह्यांची एकूण संख्या किती ?
 उत्तर :-   26

2. सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कधी झाली ?

उत्तर :-   1 मे 1981

3.  सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून तयार करण्यात आला ? 

उत्तर :-    रत्नागिरी

4.  1 मे 1981 रोजी सिंधुदुर्ग सोबत आणखी कोणता जिल्हा निर्माण झाला ?

उत्तर :-    जालना

5.  जालना जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्याचा भाग होता ?

उत्तर :-    औरंगाबाद

6.  सिंधुदुर्ग आणि जालना जिल्हा निर्मितीच्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते ?

उत्तर :-    बॅरीस्टर अब्दुल रहेमान अंतुले

7.  सिंधुदुर्ग आणि जालना नंतर कोणते जिल्हे एकाच दिवशी अस्तीत्वात आले  ?

उत्तर :-    लातूर आणि गडचिरोली (16  ऑगस्ट 1982)

8.  लातूर जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून तयार करण्यात आला ?

उत्तर :-    उस्मानाबाद

9. गडचिरोली जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून तयार करण्यात आला ?

उत्तर :-   चंद्रपूर

10. 1983 ते 1989 ह्या काळात राज्यातील जिल्ह्यांची संख्या किती होती ?

उत्तर :-  30

11.1990 साली कोणता जिल्हा प्रशासकीय सोयीसाठी निर्माण करण्यात आला ?

उत्तर :-   मुंबई उपनगर

12. मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मिती कधी झाली ?

उत्तर :-   4 जुलै 1990

13. मुंबई उपनगर जिल्हा  कोणत्या जिल्ह्यातून तयार करण्यात आला ?

उत्तर :-   मुंबई

14.  1998 (1  जुलै) साली कोणते 2  जिल्हे अस्तीत्वात आले  ?

उत्तर :- नंदूरबार आणि वाशीम

15. नंदूरबार जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्याचा भाग होता ?

उत्तर :-  धुळे

16. वाशीम जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्याचा भाग होता ?

 उत्तर :-  अकोला

17. राज्यात सर्वात अलीकडे निर्माण झालेले जिल्हे कोणते ?

 उत्तर :-  हिंगोली आणि गोंदिया

18. हिंगोली आणि गोंदिया ह्या जिल्ह्यांची निर्मिती कधी झाली ?

 उत्तर :-  1 मे 1999 (महाराष्ट्र दिन)

19. हिंगोली जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्याचा भाग होता ?

उत्तर :- परभणी

20. गोंदिया जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्याचा भाग होता ?

उत्तर :-    भंडारा

21. 1 मे 1999 ते आजतागायत महाराष्ट्रातील जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे ?

उत्तर :-  35

ParmeshwarThate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *