Jio Fiber देणार 500 GB डाटा व 100 Gbps, speed

Jio Fiber देणार 500 GB डाटा व 100 Gbps, speed
  जिओ लॉंच झाल्यापासून मोबाईल क्षेत्रात खळबळ उडाली असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमीच नननवीन ऑफर घेवून येते आता जिओने जीओ गिगाफायबर launch केले असून पूर्ण देशभरात 5 तारखेला अधिकृत लॉंच केले असून 6 प्लॉन लॉंच केले आहेत.

Attractive Plans  :-

1)  ब्रॉंझ प्लॅान ( 699 ) :- Bronze Plan

      या प्लॉन मध्ये ग्राहकांना 699 रूपयाच्या रिजार्चमध्ये 100 जीबी डेटा व 30 दिवसाची व्हॅलिडीटी देण्यात आली असून स्पीड 100  Mbps  पर्यंत असणार आहे. या प्लॅनमध्ये पूर्ण 100 जीबी डेटा व अतिरिक्त 50 जीबी डेटा असा एकूण 150 जीबी मिळणार आहे.

2) सिल्हर प्लॉन ( 849) :- Silver Plan

       यामध्ये प्लॅनमध्ये ग्राहंकाना 849 रूपयाचे रिजार्च करावे लागणार असून यात ग्राहकांना 200 जीबी डेटा देण्यात येणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 100  Mbps  ची स्पीड मिळणार आहे. यासोबतच ग्राहकांना यामध्ये 200 जीबी अतिरिक्त डेटा मिळणार आहे म्हणजेच एकूण 400 जीबी हायस्पीड डेटा मिळणार आहे.

3) गोल्ड प्लॅन ( 1299 ) : – Gold Plan

       या प्लॅनमध्ये ग्राहकांना 500 जीबी डेटा 30 दिवसासाठी मिळणार असून त्याचा स्पीड 250 Mbps असणार आहे. यासोबतच 250 जीबी अतिरीक्त म्हणजेच 750 जिबी डेटा मिळणार आहे.

4)  डायंमड प्लॅन  2499 :- Diamond Plan

       या प्लॅन मध्ये ग्राहकांना 1500 जीबी डाटा  दिवसासाठी मिळणार असून  त्याची व्हॅलिडीटी 30 दिवसाची असणार आहे. यामध्ये 1250 जीबी डेटा 500 एमपीबपीएस च्या स्पीडने देणार आहेत. त्यात 250 जीबी अतिरिक्त डेडा मिळणार आहे.

5) प्लॅटिनम प्लॅन 3999  :-  Platinum  Plan

      या प्लॅॅनमध्ये ग्राहकांना 2500 जीबी डेटा 30 दिवसासाठी मिळणार आहे.  या प्लॅनचा स्पीड 1 जीबीपीएस असणार आहे. या प्लॅनमध्ये सर्वात कमी किमतीत सर्वात जास्त डेटा  कंपनी देते आहे

6) टिटॅनियम प्लॅन 8499 :-  Titanium Plan

     या प्लॅनमध्ये ग्राहकांना एका महिन्यासाठी 5000 जीबी डेटा कंपनी देणार असून त्याचा स्पीडही 1 जीबीपीएस इतका जबरदस्त असणार आहे.

ठळक वैशिट्ये:-

 • सर्वच प्लॅन्ससोबत फ्री व्हॉईस देण्यात आले आहेत. याद्वारे भारतात कोठेही मोफत कॉल्स करता येतील. या सेवेसाठी जिओचे JioCall हे अ‍ॅप वापरता येईल.
 • टीव्ही व्हिडिओ कॉलिंग, गेमिंग या सेवा असतील. व्हिडिओ कॉलिंग सेवेची किंमत वार्षिक 1,200 रुपये, गेमिंग सेवेची किंमत वार्षिक 1,200 (झेरो लेटन्सी नेटसाठी), डिव्हाईस सेक्युरिटी सेवा वार्षिक 999 रुपयात उपलब्ध असेल.
 • होम नेटवर्किंग घरातील विविध खोल्यांमध्ये वायफाय मेश तयार करून इंटरनेट पुरवता येईल.
 • फोटो, म्युझिक, व्हिडिओ शेयर करण्यासाठी सेवा उपलब्ध!
 • सुरक्षेसाठी Safety & Surveillance Solution उपलब्ध करून दिले जाईल. ज्यामध्ये डोर कॅमेरा, CCTV, बाळांकडे लक्ष ठेवण्यासाठी बेबी मॉनिटरचा समावेश.
 • आभासी जगाची सफर घरबसल्या करण्यासाठी व्हर्च्युअल रियालिटी हेडसेटचा समावेश थिएटरमध्ये बसून चित्रपट पाहण्याचा अनुभव.
 • जिओ होम गेटवे हा राऊटर असेल जो जिओ फायबरद्वारे वायफाय मार्फत सेवा पुरवेल.

सेवेची किंमत ठळक वैशिट्ये

 सेवा घेण्यासाठी तुम्हाला 2,500 रुपये डिपॉजिट भरायचे आहे (हे एकदाच द्यावं लागेल) यामधील 1,500     रुपये परत मिळू शकतील तर उर्वरित 1,000 रुपये इंस्टॉलेशन चार्ज असेल.  जिओच्या वेलकम ऑफर अंतर्गत जिओ होम गेटवे, 4K Jio Set Top Box मोफत मिळेल.  एक टीव्ही (गोल्ड आणि पुढील प्लॅन्समध्ये म्हणजे दरमहा 1,299 आणि त्यापुढील प्लॅन्स) मिळेल. सोबत OTT सेवांद्वारे चित्रपट, मालिका, गाणी मोफत पाहता येतील.
 1. गोल्ड प्लॅन :- 1 वर्षासाठी घेतल्या स Muse 2 Bluetooth speaker मिळेल. 2 वर्षांसाठी घेतला तर 24 इंची एचडी टीव्ही मिळेल.
 2. सिल्व्हर प्लॅन :- वर्षासाठी घेतल्यास Thump 2 Bluetooth speakers मिळतील.
 3. डायमंड प्लॅन :- वर्षासाठी घेतल्यास 24 इंची एचडी टीव्ही मोफत देण्यात येईल.
 4. प्लॅटिनम प्लॅन्स :- वर्षासाठी घेतल्यास 32 इंची एचडी टीव्ही मोफत देण्यात येईल.
 5. टायटॅनियम प्लॅन :- वर्षासाठी घेतल्यास 43 इंची 4K टीव्ही मोफत मिळेल.

नोंदणी कशी कराल?

● www.jio.com वर जा किंवा MyJio अ‍ॅप घ्या. JioFiber सेवेसाठी नोंदणी करा.
● तुमचा पत्ता, नाव, मोबाईल क्रमांक विचारला जाईल.
● जर तुमच्या भागात जिओ फायबर सेवा असेल तर त्यांचा प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल पुढील प्रक्रिया  त्यांच्यामार्फत पार पाडली जाईल.
● दरमहा/ चौमाही/ वार्षिक अशा कोणत्याही प्लॅन्सने रीचार्ज केल्यास ग्राहकांना सेट टॉप बॉक्स देण्यात येईल.

ParmeshwarThate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *